Nashik MNS : नाशिकमध्ये संवाद सप्ताह ; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मनसे सज्ज
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मनसे सज्ज, नाशिकमध्ये मनसेकडून संवाद सप्ताहाचं आयोजन, येणाऱ्या निवडणुकांसाठी सर्व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं जाणार.
विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर आता मनसे पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सज्ज झाल्याचा पाहायला मिळत आहे. नाशिकमध्ये मनसेकडून संवाद सप्ताहाच आयोजन करण्यात आला आहे. नाशिक शहरातील सर्व विभागातील पदाधिकाऱ्यांना येणाऱ्या निवडणुकांसाठी या सप्ताहात मार्गदर्शन केले जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत इच्छुक उमेदवारांसाठी अर्ज देखील दिले जात आहे. यामुळे आता नाशिक मनसे कडून येणाऱ्या निवडणुकीसाठी जय्यत तयारी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. नाशिकच्या राजगड या मनसे कार्यालयातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम बोडके यांनी..
- आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांसाठी मनसे सज्ज
- *मनसे कडून नाशिकच्या मनसे कार्यालयात पदाधिकारी संवाद सप्ताह*
- पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी मनसेकडून पुन्हा एकदा प्रयत्न ...
- *विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर आगामी काळातील निवडणुकांसाठी मनसे सज्ज*
- मनसे कार्यालयात पदाधिकारी संवाद सप्ताह...