Nashik Misal Party : नाशिकमध्ये महिलांसाठी मिसळपार्टीचं आयोजन
Nashik Misal Party : नाशिकमध्ये महिलांसाठी मिसळपार्टीचं आयोजन
हेही वाचा :
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या मोर्चेबांधणीसाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या नवी दिल्लीत बैठका सुरु आहेत. भाजपच्या नवी दिल्लीतील बैठकीत 105 विधानसभा मतदारसंघाबाबत चर्चा झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या बैठकीत बोरिवली विधानसभा मतदारसंघाबाबत चर्चा झाली. भाजपचे बोरिवलीचे आमदार सुनिल राणे यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. कारण, या मतदारसंघातून माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी तयारी सुरु केली आहे. भाजपचे सुनिल राणे आमदार असलेल्या बोरिवली मतदारसंघातून गोपाळ शेट्टी विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक आहेत. भाजपच्या दिल्लीतील बैठकीत यासंदर्भात चर्चा झाली आहे. गोपाळ शेट्टींच्या उमेदवारीवरून बैठकीत दोन नेत्यांमध्ये मतांतर झाल्याची माहिती आहे. लोकसभा निवडणुकीत गोपाळ शेट्टींचे तिकीट कापलं गेलं होतं. त्यामुळं गोपाळ शेट्टी यांचं पुर्नवसन करण्याची विनंती मुंबईतील नेत्यांकडून करण्यात आली आहे. मुंबईतील एका नेत्याचा गोपाळ शेट्टींसाठी आग्रह असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मात्र, तो नेता नेमका कोण याचं नाव समोर आलेलं नाही. बोरिवली विधानसभेबाबत कालच्या भाजपच्या बैठकीत तोडगा निघाला नाही. पुढील बैठकीत यावर चर्चा करण्यास पक्षश्रेष्ठींनी सांगितलं असल्याची माहिती आहे.