Nashik Majha Impact : नाशिक महापालिकेने छतावरील डासांचं उत्पत्ती स्थळ हटवलं

Continues below advertisement

नाशिक : नाशिकमधील (Nashik News)  डेंग्यूच्या (Dengue )  प्रादुर्भावावरुन काँग्रेस पक्ष आणि ठाकरे गट आक्रमक झाला आहे. महापालिका इमारतीच्या गच्चीवर डासाची उत्पत्ती स्थळे असल्याची बातमी एबीपी माझाने दाखवली होती. त्यानंतर आज काँगेस पदाधिकाऱ्यांनी मनपा आयुक्ताना डेंग्यू डासाची प्रतिकृती भेट दिली. तर काँग्रेसपाठोपाठ ठाकरे गटाचे पदाधिकारी देखील मनपा आयुक्त अशोक करंजकर यांच्या भेटीसाठी पोहोचले. ताबडतोब डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्याची मागणी पदाधिकाऱ्यांनी केली.
 
नाशिक शहरात जागोजागी डेंग्यूचे डास, अळ्या दिसत असून घराघरात डेंग्यूचे रुग्ण आढळत आहेत. डेंग्यूचा उद्रेक रोखण्यात अपयशी ठरलेल्या नाशिक महापालिकाने नागरिकां जबाबदार धरत दंडाची रक्कम दुपटीने वाढवली आहे. नागरिकांना दंड आकारणी करणाऱ्या  मनपा प्रशासनाची परिस्थिती लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः मात्र कोरडे पाषाण अशी झाली आहे.महापालिका मुख्यालयाच्या इमारतीबरच पाण्याचे डबके आणि त्यात डासांच्या अळी एबीपी माझाच्या कॅमेरात कैद झाल्या आहेत.  यानंतर राजकीय पक्षाच्या नेत्यांनी मनपाचा धावा करत आयुक्तांना धारेवर धरले. काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी डेंग्यू डासांची प्रतिकृतीच मनपा आयुक्तना भेट दिली. तर ठाकरे गटाचे खासदार राजभाऊ वाजे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मनपा प्रशासनाला अल्टीमेटम देत आंदोलनाचा इशारा दिलाय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram