Nashik Leopard : नाशकात बिबट्याचा वावर, अफवा पसरवणाऱ्यांविरोधात वनविभाग गुन्हे दाखल करणार

नाशिकमध्ये सध्या बिबट्याचा वावर वाढल्याचं बघायला मिळत असतांनाच दुसरीकडे सोशल मिडीयावर अफवांनाही चांगलेच पेव फुटले आहे. कधी झाडावर बिबट्या बसल्याचे फोटो तर कधी एखाद्या परिसरात बिबट्या दिसल्याच्या पोस्टमुळे वनविभाग हैराण झालय. अशा अफवा पसरवणाऱ्या पोस्टमुळे नागरिकांमध्येही भितीचे वातावरण पसरत आहे. अशा  अफवा पसरणाऱ्यांविरोधात थेट वनविभाग गुन्हे दाखल करणार असून त्यासाठी सायबर पोलिसांचीही मदत घेतली जाणार आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola