Nashik Leopard : 16 पिंजरे, 25 कॅमेरा लावूनही नाशिकमध्ये बिबट्या मोकाट
पाच वर्षांच्या मुलीला जंगलात नेऊन मारणाऱ्या बिबट्याला ठार करण्यात येतं की काय अशी शक्यता आता निर्णाण झालीये.. कारण तशी मागणी नाशिक वन विभागानं वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली आहे. बिबट्याला पकडण्यासाठी 16 पिंजरे, 25 कॅमेरा लावुनही बिबट्या हाती लागत नाहीये.. त्रंबकेश्वर तालुक्यातील पिंपळद, ब्राह्मणवाडे गावात बिबट्याची दहशत आहे... आठ दिवसापासून वन विभागाचा बिबट्याला पकडण्यासाठी 24 तास पहारा आहे... अत्याधुनिक गन, डार्ट घेऊन अधिकारी सज्ज आहेत, तर ड्रोनच्या सहायाने बिबट्याचा शोध घेतला जातोय..