Nashik Kumbhamela Land Acquisition : सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वीच नाशिकमध्ये वादाचा आखाडा ABP Majha
Nashik Kumbhamela Land Acquisition : सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वीच नाशिकमध्ये वादाचा आखाडा ABP Majha
सिंहस्थ कुंभमेळा तोंडावर आला असतांना राज्य सरकार आणि महापालिका प्रशासनात टोलवाटोलवी सुरू झाली आहे, कुंभमेळा आयोजनासाठी महापालिकाने भूसंपादन आणि आराखडा तयार करण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र अडीचशे एकर क्षेत्राचे भूसंपादन करण्यास महापालिकाने असमर्थता दर्शविली आहे. हा नाशिक शहराचा नाही तर आंतरराष्ट्रीय इव्हेंट आहे, त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकारने भूसंपादन करावे अशी मागणी करत शासनाच्या कोर्टात चेंडू टोलावला आहे. हे कमी होते म्हणून की काय साधू महंतांनी यात उडी घेतली असून कुंभमेळा लाखो साधू महंत एकत्र येत असतात तो दैदिप्यमान झाला पाहिजे यासाठी एकमेकांनी जबाबदारी झटकण्या पेक्षा एकत्र येऊन काम करण्याचा सल्ला दिलाय. अन्यथा केंद्रीय स्तरावर जाऊन तक्रार करण्याचा इशारा दिलाय.