Nashik Kumbh Mela : 31 ऑक्टोबर 2026 पासून कुंभमेळा पर्वाला सुरुवात होणार, संभाव्य तारखा जाहीर

Nashik Kumbh Mela : 31 ऑक्टोबर 2026 पासून कुंभमेळा पर्वाला सुरुवात होणार, संभाव्य तारखा जाहीर

Nashik Kumbh Mela: नाशिक (Nashik) आणि त्र्यंबकेश्वरच्या (Trimbakeshwar) शाही स्नानाच्या संभाव्य तारखा समोर आल्या आहेत. 31 ऑक्टोबर 2026 पासून कुंभमेळा (Kumbh Mela) पर्वाला सुरुवात होणार आहे. 24 जुलै 2028 पर्यंत कुंभमेळा सुरू राहणार आहे. या कुंभमेळ्यात 42 ते 45 पर्वस्नान असणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 13 आखाड्याचे महंत यांच्या उपस्थितीत आज कुंभमेळाच्या नियोजन संदर्भात महत्वाची बैठक पार पडत आहे. या बैठकीत कुंभमेळाच्या नाशिक आणि त्रंबकेश्वरच्या शाही स्नानाच्या तारखा जाहीर होणार आहेत.

कुंभमेळ्याच्या संभाव्य तारखा खालीलप्रमाणे-

31 ऑक्टोबर 2026 रोजी कुंभमेळाचे रामकुंडावर  ध्वजारोहण होईल तेव्हा पासून कुंभमेळा पर्वा ला सुरवात होणार आहे.

24 जुलै 2028 पर्यत कुंभमेळा सुरू राहील.

कालावधी एकूण 42 ते 45 पर्व स्नान असणार आहेत आखाड्याचे साधू महंत स्नान करतील असे शाही स्नानाचे दिवस.

24/7/2027 रोजी आषाढ कृष्ण पंचमीच्या दिवशी आखाडा चे ध्वजारोहण होणार आहे.

29/7/2027 एकादशीच्या दिवशी नगर प्रदक्षिणा होणार आहे.

शाहीस्नान तारखा-

2 ऑगस्ट 2027 सोमवती अमावस्याच्या दिवशी पहिले शाही स्नान होणार आहे.

31 ऑगस्ट 2027 श्रावण वद्य अमावस्या ला महाकुंभस्नान होणार आहे.

11 सप्टेंबर 2027 ला भाद्रपद शुद्ध एकादशीच्या शाही स्नान म्हणजेच अमृत स्नान होणार आहे.

मुख्य पर्वकाळ असणाऱ्या 31 ऑगस्ट2027 च्या दिवशी सूर्य चंद्र गुरू सिंह राशीत आहेत, त्यामुळे या दिवशी महाकुंभ स्नान केलें जाणार आहे.

यंदाचा कुंभमेळा त्रिखंडी कुंभमेळा आहे, यात गुरू हा वक्री होऊन सिंह राशीतून कर्क आणि कन्या राशीत प्रवेश करतो.

यंदा चा कुंभमेळा वक्री आहे, म्हणजेच गुरू चे भ्रमण इतर राशीमध्ये होणार आहे. कोणत्या दिवशी गुरू कोणत्या राशीत प्रवेश करणार याची माहिती. 

31/10/2026 गुरू सिंह राशीत प्रवेश
24/1/2027वक्री होऊन गुरू कर्क राशीत प्रवेश
25/6/2027 गुरू सिंह राशीत प्रवेश
26/11/2027 गुरू कन्या राशीत प्रवेश
28/2/28 गुरू सिंह राशीत प्रवेश
24/7/2028 गुरू कन्या राशीत प्रबेश करत आहे.

कुंभमेळाचे ध्वजारोहण 31 ऑक्टोबर 2026 ला असल्याने सिंहस्थ कुंभमेळाच्या दुसऱ्या  खंडात कुंभमेळ्याच्या शाही पर्वणी सुरु होऊन 24 जुलै2028 रोजी कुंभमेळा समाप्त होणार आहे.

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola