Nashik Kalika mata Temple : नाशिकचं ग्रामदैवत कालिका माता मंदिरात आकर्षक रोषणाई
Nashik Kalika mata Temple : नाशिकचं ग्रामदैवत कालिका माता मंदिरात आकर्षक रोषणाई
नवरात्रोत्सवाला आता अवघे चार दिवस बाकी असून त्या पार्श्वभूमीवर नाशिकची ग्रामदेवता म्हणून ओळख असलेल्या कालिका माता मंदिर संस्थानची तयारीही अंतिम टप्प्यात आली आहे. मंदिराला देव देवतांच्या थीमवर आधारित आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली असून यामुळे हा संपूर्ण परिसर उजळून निघाला आहे. यंदा पहिल्यांदाच कालिका देवीचा नवरात्रोत्सव दसरा नाही तर कोजागिरी पोर्णिमेपर्यंत साजरा केला जाणार असल्याने भाविकांसाठी ही एक पर्वणीच ठरणार आहे. उत्सव काळात दरवर्षी जिल्हाभरातून लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी दाखल होत असतात आणि यावर्षी या संख्येत वाढ होण्याची शक्यता लक्षात घेता त्या दृष्टीने पोलिसांकडून नियोजन करण्यात येत असून कडेकोट बंदोबस्तासोबतच मंदिर परिसरात 50 सिसीटीव्ही कॅमेरांची नजर असणार आहे. देणगी दर्शन हे ऐच्छिक ठेवण्यात आले असून त्यासाठी शंभर रुपये भाविकांना मोजावे लागणार आहे तर भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने भाविकांचा दोन लाखांचा अपघाती विमा संस्थांकडून काढण्यात येणार आहे. दरम्यान कालिका देवीचा नवरात्रोत्सव यंदा कसा साजरा होणार ? कशी सुरु आहे तयारी ? याबाबत कालिका मंदिर संस्थानचे अध्यक्ष केशव पाटील यांच्याशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी..