Onion Export Duty: नाशिक बाजार समित्या बंद केल्यामुळे मोठं नुकसान- जयदत्त होळकर
Onion Export Duty: नाशिक बाजार समित्या बंद केल्यामुळे मोठं नुकसान- जयदत्त होळकर कांद्यावर केंद्राने 40 टक्के निर्यातशुल्क लागू करताच कांद्याचा प्रश्न महाराष्ट्रात पेटला असून या निर्णयाच्या निषेधार्थ आज कांद्याचे आगार समजल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील 15 कृषी उत्पन्न बाजार समितीत लिलाव बंद ठेवण्यात आले आहेत यामुळे अंदाजे 20 ते 25 कोटी रुपयांची उलाढाल ठप्प होण्याची शक्यता आहे. आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ असलेल्या एकट्या लासलगावमध्येच 5 कोटी दिवसाला व्यवहार होत असतात. जिल्ह्यात दिवसाला एक ते दिड लाख क्विंटल कांद्याची आवक होते तर एकट्या लासलगावमध्येच 21 ते 25 हजार क्विंटल कांदा येत असतो. दरम्यान हा निर्णय रद्द केला नाही तर शेतकऱ्यांच्या मोठ्या रोषाला सरकारला सामोरे जावे लागेल असं कांदा विषयावरील तज्ञ तथा मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक जयदत्त होळकर यांनी एबीपी माझाशी बोलतांना म्हंटल असून पोर्ट बाहेर उभे असलेले कंटेनरही परत येतील आणि मोठे नुकसान होईल अशी भितीही त्यांनी व्यक्त केली आहे.