Nashik IT Raid : सात बड्या बिल्डरांकडे 3 हजार 333 कोटींची मालमत्ता? ABP Majha
Continues below advertisement
नाशिक शहर व परिसरातील सात बड्या बांधकाम व्यावसायिकांवर आयकर विभागाच्या पथकाने गेले सहा दिवस छापे टाकले. मंगळवारी ही कारवाई संपली. यात तब्बल ३ हजार ३३३ कोटींचे बेहिशेबी मालमत्तेचे व्यवहार उघडकीस आले.,तर साडेपाच कोटींची रोकड व दागिनेही जप्त करण्यात आले आहेत. आयकर विभागाची महाराष्ट्रातील ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे सांगितलं जातंय. नाशिकच्या आयकर अन्वेषण विभागासह छत्रपती संभाजीनगर, ठाणे, पुणे, मुंबई, नागपूर कार्यालयातील २२५ अधिकारी-कर्मचाऱ्यांचं पथक दिवस- रात्र ही कारवाई करत होतं. .
Continues below advertisement