Nashik Horizon Academy शाळेनं फी न भरलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणातून वगळलं, पालकांचा संताप

नाशिकमध्ये होरायझन अकादमी या शाळेनं फी न भरलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणातून वगळल्य़ाचा प्रकार समोर आला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी फी भरली केवळ त्यांचेच ऑनलाईन लेक्चर्स सुरु केल्याचं सांगितलं जातंय. शिक्षण ऑनलाईन आहे, मग लायब्ररी आणि कॉम्प्युटर फी कशासाठी मागितली जातेय हा सवाल पालकांकडून केला जातोय. लॉकडाऊनच्या या परिस्थितीत शाळांनी फी भरणं अनिवार्य करणं हे चुकीचं आहे कारण लॉकडाऊनमुळे सर्वत्रच आर्थिक गणित विस्कटलंय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola