Nashik Hanuman Jayanti : नाशिकच्या सिद्ध हनुमान मंदिरात पार पडला जन्मोत्सव सोहळा

Continues below advertisement

Nashik Hanuman Jayanti : नाशिकच्या सिद्ध हनुमान मंदिरात पार पडला जन्मोत्सव सोहळा हनुमान जयंती निमित्ताने हनुमानाचं जन्मस्थान अर्थातच नाशिकच्या अंजनेरी पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या सिद्धहनुमान मंदिरात पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केलीय.रामनवमीपासूनच इथे उत्सवाच्या तयारीला सुरुवात होते, मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली असून मूर्तीला महावस्त्र परिधान करण्यात आले आहे. आज पहाटे वाजत गाजत मिरवणूक काढण्यात येऊन ६ वाजून १५ मिनिटांनी हनुमानाचा जन्म सोहळा इथे पार पडला आणि भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले. दरवर्षी महाराष्ट्रासह इतर राज्यातून भक्त दर्शनासाठी मोठ्या संख्येने अंजनेरीला दाखल होत असतात. जय हनुमान, रामभक्त हनुमान की जयच्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमुन गेला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram