Nashik Hanuman Jayanti 2023 : हनुमान जयंतीनिमित्त वाजत-गाजत मिरवणूक, Anjaneri गडावरुन 'माझा' लाईव्ह

आज हनुमान जयंती... हनुमान जयंती म्हणजे भगवान हनुमान यांचा जन्मोत्सव, चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सूर्योदयाला हनुमानाचा जन्म झाला अशी आख्यायिका सांगितली जाते...हनुमान जयंती निमित्तानं अंजनेरी गावातील श्री सिद्ध हनुमान मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली... तसच या 11 फुटी मुर्तीला महावस्त्र परिधान करण्यात आलं.. आज पहाटे वाजत - गाजत मिरवणूक काढण्यातही आली. सकाळी ६ वाजून २८ मिनिटांनी हनुमानाचा जन्म सोहळा उत्साहात पार पडला, आणि भाविकांना दर्शनासाठी मंदीर खुलं करण्यात आलं. दरवर्षी महाराष्ट्रासह इतर राज्यातून भक्तगण दर्शनासाठी मोठ्या संख्येनं अंजनेरीला दाखल होत असतात. जय हनुमानच्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमुन गेलाय..

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola