Nashik Girana Dam : नाशिक गिरणा धरणात केवळ 23.45 टक्के जलसाठा, मागील वर्षाच्या तुलनेत जलसाठ्यात घट
abp majha web team
Updated at:
27 Jul 2023 11:00 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहाराष्ट्रातील सर्वाधिक जल साठवण क्षमता असलेल्या गिरण धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मान्सूनची अवकृपा झालीय. पर्जन्यमान कमी झाल्याने धरणाने आता तळ गाठलाय.. गेल्या वर्षी जुलैमध्ये हे धरण ९२ टक्के भरलेले होते.त्यातून ७ हजार ५०० क्युसेस पाणी देखील सोडण्यात आले होते..यंदा मात्र पाणलोट क्षेत्रात पाहिजे तसा पाऊस न झाल्याने पाण्याची पातळी खाली गेली आहे..मागील वर्षाच्या तुलनेत जलसाठ्यात ६९ टक्के एवढी मोठी घट झाली असून धरणात अवघा २३.४५ टक्के जलसाठा शिल्लक आहे.. त्यातील ७ टक्के जलसाठा हा मृतसाठा असून हे पाणी वापरण्या योग्य नाही..