Nashik Ganpati : नाशकात जय बजरंग मित्र मंडळानं साकारली पंढरी, विठ्ठलाची 15 फूटाची मुर्ती

नाशिकमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी यंदा पौराणिक देखाव्यांवर अधिक भर दिल्याचं पाहायला मिळतंय... कॉलेज रोड परिसरातील जय बजरंग मित्र मंडळानं यंदा पंढरी साकारलीय... विठ्ठलाची जवळपास 15 फूट भव्य मूर्ती या देखाव्याचे आकर्षण आहे... हाती टाळ, मृदुंग, वीणा घेऊन भजन किर्तनात दंग झालेले वारकरीही इथं पाहायला मिळतायत... तर पंचवटीतील मालेगाव स्टँड मित्र मंडळाने महिमा खंडेरायाचा हा चलचित्रा देखावा साकारलाय... देखाव्यात खंडेरायाच्या महिमा दाखवण्यात आल्यात.. तर तिकडे अशोकस्तंभ गणेशोत्सव मित्र मंडळामार्फत यंदा कृष्णालीला देखावा साकारण्यात आलाय.. हे देखावे पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होतेय...

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola