Beed : पावसाअभावी बीडमध्ये सोयाबीन, कापूस पिकांचं नुकसान; मदतीअभावी शेतकरी हैराण
राज्यात काही भागात पावसाला सुरुवात झाली आहे खरे मात्र बीडमध्ये आणखीही पाऊस पोहोचला नाही. आणि त्यामुळे ज्या काळात कापूस आणि सोयाबीन सारख्या पिकांना पाण्याची सर्वाधिक गरज असते त्याच काळात या पिकांना पाणी मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झालेत. तीन आठवडे उलटून गेले तरी बीड जिल्ह्यात सर्व दूर पाऊस झालेला नाही आणि त्यामुळे पावसाअभावी पिके करपू लागली आहेत. काय आहे बीड जिल्ह्यातील पावसा अभावी पिकांची झालेली परिस्थिती पाहूयात माझाचा स्पेशल रिपोर्ट.