Nashik Gangapur Dam : मोठी बातमी! गंगापूर धरणात चर खोदण्याचा प्रस्ताव शासनाने फेटाळला

Continues below advertisement

नाशिक जिल्ह्यामध्ये उन्हाचा पारा हा दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे नाशिकमध्ये वाढत्या तापमानाचा परिणाम नाशिककरांवर दिसून येत आहे. त्यातच आता नाशिक मधील पाणी संकट हे अधिकच गडद होऊ लागले आहे. नाशिककरांची तहान भागवणाऱ्या गंगापूर धरणात अवघा 25% पाणीसाठा शिल्लक आहे त्यामुळे नाशिककरांवर पाण्याचे संकट येऊन ठेपले आहे. गंगापूर धरणात पाणीसाठा कमी झाल्यामुळे चर खोदण्याचा प्रस्ताव देखील नाशिक महानगरपालिकेकडून राज्य शासनाला पाठवण्यात आला होता मात्र निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे हा प्रस्ताव शासनाकडून फेटाळण्यातआल्याची माहिती मिळत आहे. नाशिक महानगरपालिकेत प्रशासकीय राजवट असून निर्णय घेण्यासाठी अन्य तांत्रिक बाबी पूर्ण होत नसल्याने चर खोदण्याचा निर्णय शासन स्तरावर घेण्यासाठी नाशिक महानगरपालिकेने प्रयत्न केले मात्र आचारसंहितेमुळे या प्रस्तावाकडे शासनाने गांभीर्याने लक्ष न दिल्यामुळे नाशिककरांचा पाणी प्रश्नावर तोडगा निघत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आता गंगापूर धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने नाशिककरांचा पाण्याचा प्रश्न आता अधिकच तीव्र झाल्याचे पाहायला मिळत आहे सध्या गंगापूर धरणातील पाण्याची परिस्थिती काय आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम बोडके यांनी बघूया..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram