Nashik Flood : नाशिकमध्ये गोदावरी पूल पाण्याखाली, वाहनतळ पाण्याखाली; धार्मिक विधींना अडचणी
गोदावरी नदीला आलेल्या पुराने गोदा काठी असणाऱ्या रस्त्यावर पाणी साचले आहे, रामकुंडाकडे जाणारी वाहतूक बॅरिकेटिंग करून थांबविण्यात आली आहे. वाहनतळ पाण्याखाली गेलं असून धार्मिक विधींना ही अडचणी येत असून रस्त्यावरच स्नान आणि विधी पार पडत आहेत. सलग तीन दिवसापासून गोदावरीची पूरस्थिती कायम आहे, जलमय रस्त्यावरून गोदावरीच्या पुराचा आढावा घेतलाय.
गोदा काठावरील पूजा साहित्य, भाजीपालाट
पूजा साहित्यसह इतर विक्रेत्यांचे हाल
गोदा काठावरील टपऱ्या भांडी बाजार, सराफ बाजारात हलविल्या
रस्त्याच्या मधोमध दोन तीन दिवसांपासून टपऱ्या ठेवल्याने व्यवसायावर परिणाम
महानगरपालिका प्रशासनाने कुठल्याही सूचना दिल्या नसल्याचा व्यावसायिकांचा आरोप
पूरस्थिती कायम असल्याने व्यवसायवर परिणाम
नाशिकच्या गिरणा खोऱ्याच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने गिरणा खोऱ्यातील धरणांच्या पाणी पातळीमध्ये झपाटयाने वाढ होतेय. तसंच सर्वच धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने गिरणा आणि मोसम नदी दुथडी भरून वाहत आहे.२० दिवसांपूर्वी अवघा 15 टक्के पाणीसाठा असलेल्या खान्देशसाठी वरदान ठरलेल्या उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या गिरणा धरणाची पाणी पातळी ६० टक्क्याच्या वर गेल्याने गिरणा धरणावर अवलंबून असलेल्या मालेगाव, नांदगाव, चाळीसगाव तसेच ग्रामीण भागाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटलाय.