ABP Majha Marathi News Headlines 3 PM TOP Headlines 3PM 26 August 2024
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppABP Majha Marathi News Headlines 3 PM TOP Headlines 3PM 26 August 2024
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात दीपक केसरकर यांची मोठी घोषणा, मुख्याध्यापिका, वर्ग शिक्षिका आणि दोन्ही सेविकांवर पॉक्सो अंतर्गत कारवाई करण्याची शिफारस
महिला अत्याचार रोखण्यासाठी सर्व शाळांमध्ये पॅनिक बटण बसवणार,शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची माहिती..बदलापूर घटनेतल्या आरोपीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी.
बदलापूर प्रकरणी पीडित चिमुकलीच्या बाजूनं असीम सरोदेंकडून वकीलपत्र दाखल, पोलिसांनी अपुरी कलमं लावल्याचा सरोदेंचा आरोप
संभाजीनगरमध्ये आदित्य ठाकरेंच्यासमोर भाजप कार्यकर्त्यांची निदर्शनं, कालच्या मोदींच्या दौऱ्यादरम्यान दानवेंनी केलेल्या घोषणाबाजीचा बदला घेतल्याची चर्चा
पैठणमध्ये मराठा आंदोलकांनी अडवला आदित्य ठाकरेंचा ताफा, ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देण्याबाबत भूमिका स्पष्ट करण्याची मागणी
मुंबई-गोवा महामार्गाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पाहणी सुरू, पनवेलजवळच्या पळस्पे नाक्यापासून दौऱ्याला सुरुवात
((पाहणीवर पाणी, तीच ती महामार्गाची कहाणी!))