Nashik : लाचखोर शिक्षणाधिकारी Vaishali Veer यांच्या घरी काय सापडलं?

Continues below advertisement

नाशिक जिल्हा परिषदेतील मोठा मासा एसीबीच्या गळाला लागला असून माध्यमिक शिक्षणाधिकारी वैशाली वीर एसीबीच्या जाळ्यात अडकल्या आहेत. तक्रारदार यांच्या संस्थेच्या शाळांना मंजूर झालेल्या 20% अनुदानाप्रमाणे नियमित वेतन सुरू करण्याबाबतचा कार्यादेश काढून देण्याकरता 8 लाखांची लाच घेतल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  भद्रकाली पोलिस ठाण्यात लाचलूचपत प्रतिबंधक कायद्यानुसार शिक्षणाधिकारी वैशाली वीर यांच्यासह प्राथमिक शिक्षक आणि शासकीय चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  प्राथमिक शिक्षक पंकज दशपुते आणि शासकीय चालक ज्ञानेश्वर येवले यांना अटक केली असून  शिक्षणाधिकारी वैशाली वीर थोड्याच वेळात चौकशीसाठी भद्रकाली पोलिस ठाण्यात होणार हजर होणार आहेत. 

तक्रारदार यांच्या संस्थेच्या शाळांना मंजूर झालेल्या 20% अनुदानाप्रमाणे नियमित वेतन सुरु करण्याबाबतचा कार्यादेश काढून देण्याकरता राजेवाडी शाळेचे प्राथमिक शिक्षक पंकज दशपुते यांनी 6 जुलै 2021 ला शिक्षणाधिकारी वैशाली वीर यांच्यासाठी 9 लाख रूपयांच्या लाचेची मागणी तक्रारदाराकडे केली. 27 जुलैला तडजोडीअंती 8 लाख रुपये वीर यांनी मान्य केले. 

काल संध्याकाळी साडेपाच वाजता शासकीय वाहन चालक ज्ञानेश्वर सूर्यकांत येवले यांच्यामार्फत ही लाच त्र्यंबकनाका परिसरात स्वीकारत असतांनाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चालक येवलेला रंगेहाथ पकडले. ठाणे लाचलुचपत विभागाने केलेली ही कारवाई नाशिकमध्ये सध्या चांगलाच चर्चेचा विषय ठरते आहे. 

रात्री उशिरापर्यंत शिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनात लाचलुचपत विभागाची चौकशी सुरू होती.  कोरोनाकाळात ग्रामीण भागातील शाळांचे नियोजन आणि ईतर महत्वाच्या कामांची वैशाली वीर यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली असतांनाच हा प्रकार समोर आल्याने नाशिक जिल्हा परिषदेत एकच खळबळ उडालीय. वैशाली वीर यांनी अशाप्रकारे गैरमार्गाने अजून किती संपत्ती गोळा केलीय ? यात अजून कोणा कोणाचा सहभाग आहे ? हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram