Nashik Cylinder Blast : नारायण बापू नगरमध्ये सिलेंडर स्फोट, महिलेसह 3 मुलं जखमी
Continues below advertisement
नाशिकच्या नारायण बापू नगरमध्ये आज सकाळी गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट होऊन महिलेसह तिची तीन मुलं जखमी झाल्याची घटना समोर आलीय. लोखंडे चाळीतील एका भाड्याच्या घरामध्ये सुगंधा सोळंकी या घरात स्वयंपाक करत असतांना अचानक गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. घरावरील पत्रे उडाले तसंच स्फोटामुळे लागलेल्या आगीत सुगंधा सोळंकी या 50 टक्के भाजल्या असून त्यांचा पहिला मुलगा रुद्र हा 15 टक्के तर आर्यन आणि सूर्या ही दोन मुले पाच टक्के भाजली आहेत. महिलेची प्रकृती गंभीर असल्यानं तिला तिच्या मुलांसह जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय.
Continues below advertisement