Nashik मध्ये पिता अन् जुळ्या मुलांचे मृतदेह आढळले, मुलांची हत्या करुन वडिलांची आत्महत्या?

Continues below advertisement

नाशिकमध्ये बुधवारी एकाच कुटुंबातील तिघांचे मृतदेह सिद्ध पिंपरी गावातील एका खदाणीत पाण्यावर तरंगतांना आढळल्यानं खळबळ उडाली होती. हे मृतदेह ओझर परिसरातील भगतसिंग नगरमध्ये राहणाऱ्या शंकर महाजन आणि त्यांच्या दोन जुळ्या मुलांचे असल्याचं समोर आलं होतं. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करतायत. दरम्यान मुलांची हत्या करत वडीलांनी आत्महत्या केली असावी, असा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात असून यामागील कारणांचीही शोध घेतला जातोय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram