Mayor Election | महापौर भाजपचाच होणार, नेत्यांची प्रतिक्रिया; नगरसेवक अज्ञात स्थळी रवाना| ABP Majha

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात सत्तेची समीकरणं बदलत आहेत. त्यामुळे २२ नोव्हेंबरला होत असलेल्या महापौरपदाच्या निवडणुकीसाठी आता भाजपही सतर्क झालेली दिसतेय..ज्या महापालिकांमध्ये भाजपची सत्ता आहे, त्या ठिकाणी इतर पक्षांकडून फोडाफोडीचं राजकारण होऊ नये म्हणून भाजप सतर्क झाली आहे. त्याच पार्श्वभूमिवर नाशिक आणि चंद्रपूर महानगरपालिकेतल्या भाजप नगरसेवकांना आता अज्ञातस्थळी हलवण्यात येणार आहे. जेणेकरुन फोडाफोडीचं राजकारण होऊ नये.  सध्याच्या घडामोडी पाहता शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आल्यास राज्यात महाशिवआघाडीचं सरकार शक्य आहे.. आणि हीच समीकरणे कायम राहिल्यास महापौर निवडणुकीत महाशिवआघाडीचा फटका बसू नये म्हणून भारतीय जनता पक्ष सतर्क झाला आहे. नाशिकच्या नगरसेवकांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola