Nashik CitiLink Bus Workers Strike : सिटीलिंकच्या कंत्राटी कामगारांचं आंदोलन, आंदोलकांची मागणी काय?
आजची सकाळ उजाडताच नाशिक शहरातील नागरिकांचे हाल सुरू झाले आहेत.. कारण सिटी लिंक बस कर्मचाऱ्यांनी पुन्हा कामबंद आंदोलन सुरू केलंय. ठेकेदारकडून 3 महिन्यापासून वेतन दिले जात नाहीये.. वेतन मिळेपर्यंत काम करणार नाही अशी भूमिका या कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. तपोवन डेपोमध्ये ते सकाळपासून आंदोलनावर बसले आहेत.