Nashik: 40 बालविवाह रोखण्यास चाईल्डलाईनला यश ABP Majha
एकीकडे विवाहासाठी मुलींचे वय 21 बंधनकारक करणारे विधेयक सरकारकडून लोकसभेत मांडले गेले असतांनाच दुसरीकडे नाशिक जिल्ह्यात चालू वर्षी आजपावेतो 42 बालविवाहाच्या घटना रोखण्यात महिला व बालविकास विभाग तसेच चाईल्ड लाईनला यश आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे यात 40 वधू होत्या तर फक्त 2 वर होते. जिल्ह्यात गेल्या वर्षी ऐन खेळण्या बागडण्याच्या वयातील 25 मुला मुलींचे विवाह पार पडले होते आणि चालू वर्षी गेल्या 11 महिन्यातच हा आकडा 42 वर जाऊन पोहोचल्याने हे प्रमाण रोखण्याचं मोठं आव्हान प्रशासनासमोर आहे. चाईल्ड लाईनच्या सदस्यांच्या पाहणीत जी माहिती समोर आली त्यानूसार लॉकडाऊनच्या काळात आलेली आर्थिक मंदी, महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटना तसेच नको त्या वयात मुलींचे असलेले प्रेमसंबंध आणि त्याला पालकांचा असलेला विरोध ही मुलींचे लग्न लहान वयातच लावून दिली जात असल्याची काही मुख्य कारणं समोर आली आहेत.