Nashik Bus Accident : नाशिकमध्ये बस-ट्रकच्या अपघातात 10 जण ठार, दादा भुसेंकडून रुग्णांची विचारपूस
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNashik Accident News Updates : नाशिकमधील (Nashik NewS) पाथरेजवळ भीषण अपघात (Accident) झाला आहे. या भीषण अपघातात 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच, अनेक प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. नाशिक-सिन्नर शिर्डी मार्गावरुन जात असताना पाथरेजवळ बस आणि ट्रकची धडक होऊन हा अपघात झाला.
सिन्नर- शिर्डी महामार्गावर (Sinnar-Shirdi Highway) पाथरे शिवारातील ईशानेश्वर मंदिराच्या कमानीजवळ सकाळच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. खाजगी आराम बस आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.
मुंबई येथून शिर्डीकडे जाणारी खासगी बस आणि शिर्डीकडून सिन्नर बाजूकडे जाणारा मालवाहू ट्रक यांची समोरासमोर धडक होऊन आपघात झाला. पाथरे ते पिंपळवाडी येथील टोलनाके दरम्यान एकेरी वाहतूक सुरू होती.
मिळालेल्या माहितीनुसार, अंबरनाथ ठाणे परिसरातील सुमारे 50 प्रवासी या बसमधून शिर्डीकडे प्रवास करत होते. उल्हासनगर येथून 15 बस साई दर्शनासाठी निघालेल्या होत्या. त्यातील एका बसला हा भीषण अपघात झाला आहे. दरम्यान, अपघातात बसचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे.