Nashik : आदिवासी विकास विभागाच्या उप आयुक्तांचं सरकारी कार्यालयात धडाकेबाज बर्थडे सेलिब्रेशन
कायमच कुठल्यानं कुठल्या कारणांमुळे चर्चेत राहणारा आदिवासी विकास विभाग अधिकाऱ्यांच्या बर्थ डे सेलिब्रेशनमुळे पुन्हा एकदा चर्चेत आलाय.. आदिवासी विकास विभागाचे उप आयुक्त सुदर्शन नगरे यांचा वाढदिवस बुधवारी धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. साहेबांचं केबिन फुलांनी सजविण्यात आले होते. एवढंच नाही तर आनंदाच्या भरात साहेबांच्या कर्मचाऱ्यांनी कार्यलयातच कोल्ड फायर लावून साहेबांच्या वाढदिवसाला चार चांद लावून टाकले.. एखाद्या सेलिब्रिटीच्या स्टेज शो सारखा माहोल आदिवासी विकास विभागाच्या कार्यलयात बघायला मिळत होता. पार्टी बोअम्बरने साहेबांचे अभूतपूर्व स्वागत करण्यात आले, आणि सहकाऱ्यांच्या उपस्थितीत boss नाव लिहिलेल्या केकचं कटिंग करण्यात आले. कल्पनेपेक्षाही जोरदार वाढदिवस साजरा झाल्यानं साहेब ही भारावून गेले आणि तेवढ्यात अतिउत्साही कर्मचाऱ्यांनी साजरी केलेल्या वाढदिवसाचे फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. वाढदिवस साजरा करण्यासाठी आणि वरिष्ठांना शुभेच्छा देण्यासाठी काहीच हरकत नाही, मात्र आपण कोणत्या जागेत आणि कशा प्रकारे वाढदिवस साजरा करतो, याचे भान बाळगायला हंव होते.