Bhavani Sword | नाशिकमध्ये साकारली साडेतोरा फूट लांब आणि 123 किलो वजनी भवानी तलवार | ABP Majha

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त नाशिकच्या छत्रपती सेनेनं एक आगळा वेगळा उपक्रम हाती घेतलाय.. साडे तेरा फूट लांब आणि 123 किलो वजनाच्या स्वराज्याच्या भवानी तलवारीच्या प्रतिकृती साकारण्यात आल्या... आज सकाळी तलवारीचा अनावरण सोहळा पार पडला. सीबीएस परिसरातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर सरकारी वकील अजय मिसर, सुरगाणा घराण्याच्या सोनाली राजे भोसले यांच्या हस्ते तलवारीचे अनावरण करण्यात आले... बिटको शाळेचे विद्यार्थी कार्यक्रमावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवाजी महाराजांचे गड किल्ले, शस्त्रास्त्रे यांच्या फोटोंचे प्रदर्शनही याठिकाणी भरवण्यात आलं... शिवजयंतीपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असणार आहे. ही तलवार बनवण्यासाठी लोखंड आणि पितळ धातूंचा वापर करण्यात आला...तलवार बनवण्यासाठी २ महिने लागले.... 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola