भास्कर जाधवांनी विनायक राऊतांचा हात झट
मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचा हा पहिलाच कोकण दौरा. पण, या दौऱ्यात भास्कर जाधव यांच्या नाराजीची चर्चा रंगली आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या दोन दिवसांच्या कोकण दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी गणपतीपुळेला भेट देत बाप्पाचं दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांच्या हस्ते विकास आराखड्याच्या कामांचं भुमिपुजन करण्यात आलं. या साऱ्यामध्ये चर्चा रंगली ती भास्कर जाधव यांच्या नाराजीची. जाहीर सभेवेळी उद्धव ठाकरे यांचा सत्कार करण्यात आला. मात्र, यावेळी भास्कर जाधव यांनी केलेली कृती सध्या चर्चेचा विषय ठरतोय.