Nashik मध्ये आठ महिन्याच्या मुलाने खेळता खेळता बेबी नेलकटर गिळलं,शस्त्रक्रिया करुन Nail cutter काढलं
आठ महिन्याच्या मुलाने खेळता खेळता बेबी नेलकटर गिळल्याची घटना काल दुपारी नाशिकरोड परिसरात घडली होती. मुलाने नेलकटर गिळल्याचं लक्षात येताच नातेवाईकांनी त्याला आडगावच्या मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल केले असता शस्त्रक्रिया करत नेलकटर बाहेर काढले. मुलाची प्रकृती आता स्थिर आहे.