Nashik Ganpati : गणपत्ती बाप्पा विथ मास्क ! योगेश टिळे यांनी साकारली 'वॅक्सिन बाप्पा' ची मूर्ती

गणेशोत्सवावर यंदा कोरोनाचं सावट आहे. गणेशोत्सवाला आता 3 दिवस बाकी आहेत, बाजारांमध्ये गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी गर्दी आहे.  नाशिकच्या बाजारामध्ये मोठी गर्दी पाहायला मिळाली.  खरेदीसाठी नागरिकांची काही प्रमाणात गर्दी  केली आहे. गणेशमूर्तीच्या खरेदीसाठी नागरिकांची बाजारात लगबग दिसून येत आहे. नाशकात मूर्तिकारांनी देखिल लसीकरणाबाबत जनजागृतीसाठी आता पुढाकार घेतला असून नाशिकचे मूर्तिकार योगेश टिळे यांनी आकर्षक असा 'वॅक्सिन बाप्पा' साकारलाय. शाडू मातीपासून सुंदर अशी मूर्ति त्यांनी तयार करत बाप्पाला डॉक्टरांचे ऍप्रन परिधान केले आहे. गणेशाच्या एका हातात मास्क, दुसऱ्या हातात सॅनिटायझर, तिसऱ्या हातात औषधांची बाटली तर चौथ्या हातात इंजेक्शन आपल्याला दिसून येत असून मूर्तिच्या मागे इंजेक्शनची मखर त्यांनी तयार केलीय. ही मूर्ती बनविण्यासाठी त्यांना 6 दिवसांचा अवधी लागला असून ग्राहकांकडून देखिल या 'वॅक्सिन बाप्पा'ला मोठ्या प्रमाणावर मागणी होते आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola