Chiplun : गोवा महामार्गाची दुरावस्था, काळे झेंडे दाखवत चिपळूणमध्ये श्रद्धांजली मानवी साखळी आंदोलन
मुंबई गोवा महामार्गाचे काम लवकर व्हावे त्याच बरोबर सर्व सुविधा मिळाव्यात या मागणीसाठी पुकारलेल्या श्रद्धांजली साखळी आंदोलनाला चिपळूणमध्ये प्रारंभ झाला.या आंदोलनामध्ये हजारो कोकणवासीय सहभागी झाले आहेत. हातात काळे झेंडे,खांद्याला काळ्या फित लाऊन शासनाचा निषेध या ठिकाणी करण्यात येत असून शासनाने लवकरात चौपदरीकरणाचे काम पूर्ण कराव अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून केली जात आहे.