Nashik : अंडरपाससाठी केंद्राकडून 47 कोटी, श्रेयासाठी सत्ताधाऱ्यांमध्येच स्पर्धा
नाशिक शहरात राज्यातील सत्ताधारी शिवसेना आणि भाजपमध्येच श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे.. यामुळे नाशिकमध्ये जागोजागी बॅनर लावण्यात आले आहेत.. इंदिरानगर आणि राणेंनगर परीसरातील बोगद्याची अर्थात अंडरपासची लांबी वाढवण्यात येणार आहे. यासाठी ४७ कोटी रुपये केंद्र सरकारनं मंजूर केले.. याचं श्रेय घेण्यासाठी भाजप आणि शिवसेना, दोघंही सरसावले आहेत. नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांचा फोटो असलेले बॅनर शिवसेनेनं जागोजागी लावले.. याचा राग आल्यानं भाजपनं देखील आमदार देवयानी फरांदे आणि माजी महापौर सतीश कुलकर्णी यांचे बॅनर लावले..