Nashik Kidnapping : अपहरण झालेल्या 'त्या' मुलाची सुटका, जाणून घ्या थरारक किस्सा ABP Majha

Continues below advertisement

नाशिक जिल्ह्यातील सिन्नर शहरात घराजवळ खेळणाऱ्या चिराग कलंत्री या एका दहा वर्षीय कांदा व्यापाऱ्याचे मुलाचे काल सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास पांढऱ्या ओम्नी वाहनातून तोंडाला मास्क लावून आलेल्या काही ईसमांनी अपहरण केल्याने एकच खळबळ उडाली होती, सोशल मिडीयात वाऱ्यासारखी ही बातमी पसरल्याने जिल्ह्यात हा चर्चेचा विषय ठरला होता. रात्री सिन्नर वासीय मोठ्या संख्येने पोलीस ठाण्याबाहेर जमा झाले होते, नाशिक ग्रामीणचे जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांचा फौजफाटा सिन्नर मध्ये दाखल झाला होता, सिन्नर मधून जाणाऱ्या प्रत्येक मार्गावर नाकाबंदी करण्यात येऊन आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली होती. मात्र रात्री जवळपास पाच तासानंतर चिराग स्वतः चालत चालत घरी सुखरुप परतला आणि त्याला बघताच कुटुंबाला आनंदाश्रु अनावर झाले तर सिन्नर वासीयांनीही सुटकेचा निश्वास सोडला. आरोपींनी जिथून त्याचे अपहरण केले होते तिथेच दुचाकीवर त्याला सोडून इथून पळ काढला होता. या घटने मागील कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीसांकडून काही सांशयितांना ताब्यात घेण्यात येऊन सध्या चौकशी केली जातीय. दरम्यान चिरागसह त्याच्या कुटुंबीयांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram