ABP News

Nana Patekar on Farmers : आता सरकारकडे मागू नका, सरकार कोणते करायचे ते ठरवा Nashik

Continues below advertisement

Shetkari Sahitya Sammelan नाशिक : शेतकरी साहित्य संमेलनाचे (Shetkari Sahitya Sammelan) आयोजन नाशिकमध्ये (Nashik) करण्यात आले आहे. प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांच्या हस्ते शेतकरी साहित्य संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांच्या (Farmers) प्रश्नांवरून नाना पाटेकर यांनी सरकारच्या भूमिकेवर संताप व्यक्त केला आहे. आता सरकारकडे मागू नका, सरकार कोणते करायचे हे ठरवा, असे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले आहे. कुठले आदर्श ठेवता आमच्या पिढीसमोर तुम्ही, काय चालले आहे? असं म्हणत सध्याच्या राजकीय घडामोडींवरही पाटेकरांनी भाषणातून नाराजी व्यक्त केली आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram