Nashik : कोजागिरी पोर्णिमेनिमित्त दुधाचे दर गगनाला भिडले; गाईच्या दुधात लिटरमागे 10 रुपयांची वाढ

Continues below advertisement

आज राज्यभरात कोजागिरी पोर्णिमा साजरी होणार आहे. आजच्या दिवशी दुधाला विशेष महत्व असते. दूध आटवत देवीला आज नैवेद्य दाखवला जाऊन त्यानंतर हे दूध प्राशन केले जाते. दूध व्यावसायिकांची मोठी उलाढाल आज होत असून नाशिकसह अनेक ठिकाणी दुधाचे दर गगनाला भिडले आहेत. म्हशीच्या दुधातच्या भावात आज तब्बल 14 ते 20 रुपयांनी तर गाईच्या दुधात लिटरमागे 10 रुपयांची वाढ झाली आहे. म्हशीच्या दूधाची आज कुठे एंशी तर कुठे शंभर रुपयांनी विक्री होत असल्याच पाहायला मिळत असून मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी झाल्याने ही परिस्थिती उदभवल्याच व्यावसायिक सांगता आहेत. दूध खरेदीसाठी अगदी पहाटेपासूनच रांगा लागल्याच चित्र नाशिकमध्ये बघायला मिळत असून आधीच महागाईची झळ सोसणाऱ्या नागरिकांना आता दूधही वाढीव किमतीने खरेदी करावं लागतं असल्याने त्यांच्याकडून नाराजी व्यक्त केली जाती आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram