Nashik : मुंबईतील अमराठी भाषिक रिक्षा आणि टॅक्सीचालक,नोंदणीकृत फेरीवाल्यांना मराठी भाषा शिकवली जाणार
मुंबईतील अमराठी भाषिक रिक्षा आणि टॅक्सीचालक, नोंदणीकृत फेरीवाले, यांना आता मराठी भाषा शिकवली जाणार आहे.. पुढील २ ते ३ महिन्यांत हा उपक्रम सुरू केला जाणार आहे. साहित्य संमेलनाच्या कुसुमाग्रज नगरीत अभिजात मराठी भाषेचं दालन सध्या सर्वांचं लक्ष बेधून घेतंय.. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा या मागणीचा केंद्र सरकारवर दबाव निर्माण करण्यासाठी हे दालन उभारण्यात आलंय.. मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्याहस्ते या दालनाचं उद्घाटन झालं..