Manoj Jarange Nashik : ताफ्यातील वाहनाचं चाक पायावरुन गेलं, सहकारी जखमी, भेटीसाठी जरांगे रुग्णालयात

Manoj Jarange Nashik : ताफ्यातील वाहनाचं चाक पायावरुन गेलं, सहकारी जखमी, भेटीसाठी जरांगे रुग्णालयात   मनोज जरांगेचे (Manoj Jarange)  सहकारी आप्पासाहेब कुढेकर यांच्या पायावरून गाडीचे चाक गेल्याने ते गंभीर जखमी झाले आहे. कुढेकर हे जरांगेंसोबत दौऱ्यादरम्यान कायम असतात. सभेसाठी  जात असताना त्र्यंबकेश्वरला पोहचल्यावर हा अपघात झाला. सुरुवातीला त्र्यंबकेश्वरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र अधिक उपचारासाठी नाशिकला हलविले. कुढेकर यांच्यावर नाशिकच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. सभा संपवून जरांगे कुढेकरांच्या भेटीसाठी रुग्णालयात पोहचले.  कुढेकरांच्या अपघातानंतर मनोज जरांगेंनी आवाहन करण्यात आले आहे.  सभांना गर्दी करा पण कुणाला इजा होऊ देऊ नका,काळजी घ्या, असे आवाहन मनोज जरांगेंनी समर्थकांना केले आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola