Mahayuti Nashik Special Report : भुजबळांच्या एन्ट्रीने नाशिकमध्ये चुरस वाढली
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMahayuti Nashik Special Report : भुजबळांच्या एन्ट्रीने नाशिकमध्ये चुरस वाढली नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत धक्का तंत्राचा वापर सुरु झाल्यानं बंडाळी होण्याची चिन्ह दिसू लागली आहे.. एकीकडे दोन टर्म नाशिक लोकसभेचे प्रतिनिधित्व करणारे हेमंत अप्पा गोडसे यांच्या नावावर काठ मारून मराठा आंदोलनाच्या वेळी ओबीसींचा मसीहा म्हणून समोर आलेल्या जरांगे पाटलांना आव्हान देणाऱ्या छगन भुजबळ यांची वर्णी लागण्याची शक्यता बळावल्यानं हेमंत अप्पाच्या समर्थकांच्या पाया खालची वाळू सरकली असून गोडसे समर्थक पुन्हा एकदा मुख्यमंत्रीच्या भेटीसाठी मुंबईच्या दिशेनं रवाना झालेत. नाशिक शिवसेनेचा बालेकिला आहे. त्यामुळे नाशिकची जागा शिवसेनेलाच सुटावी, तिकीट हेमंत गोडसेनाच द्यावे अशी आगही मागणी करत शिवसैनिकी मुंबईच्या दिशेनं रवाना झालेत