Graduate And Teacher Constituency Election : विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी आज मतदान : ABP Majha
महाराष्ट्र विधान परिषदेच्या (Maharashtra Vidhan Parishad) पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी (Graduate And Teacher Constituency Election) आज (30 जानेवारी) मतदान होणार आहे. यामध्ये नाशिक, अमरावती या पदवीधर तर औरंगाबाद, नागपूर आणि कोकण या शिक्षक मतदारसंघांचा समावेश आहे. मतदारांना सकाळी आठ ते सायंकाळी चार वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. 2 दोन फेब्रुवारी रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. या पाचही जागांची मुदत 7 फेब्रुवारी रोजी संपत आहे.