Maharashtra Politics : BJP कार्यालयाची तोडफोड करणारे नगरसेवक Sanjay Raut यांच्या भेटीला : ABP Majha

Continues below advertisement

भाजप कार्यालयाची तोडफोड केल्याप्रकरणी गुन्हा असलेले नगरसेवक संजय राऊत यांच्या सोबत असल्याचे दिसून आले आहे. नाशिकमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयाची दगडफेक करत तोडफोड केली होती. नारायण राणे यांना ज्या दिवशी अटक केली होती त्या दिवशी ही घटना घडली. या सगळ्या नगरसेवकांचा शोध नाशिक पोलिस सध्या घेत असून हेच नगरसेवक संजय राऊत यांच्या भेटीसाठी आले होते. दरम्यान, नगरसेवकांच्या अॅन्टीसिपीटरी बेलसाठी प्रयत्न करणार असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. कार्यकर्त्यांवर कठोर कलमं लावली गेली आहेत, त्या सगळ्याचा अभ्यास करून कसा मार्ग काढता येईल असा विचार करण्यात येणार असल्याचे राऊत यांनी सांगितले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram