Makar Sankranti 2023 : मकर संक्रांतीच्या सणावर महागाईचं सावट, तिळाच्या दरात ४० रुपयांची वाढ

Continues below advertisement

नववर्षाचा पहिला सण अर्थातच मकर संक्रांत आता अवघ्या काही दिवसांवर आला असून या पहिल्याच सणावर महागाईचं सावट बघायला मिळतय. तिळाच्या दरात गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल 40 रुपयांनी वाढ झालीय, तिळीने 200 चा आकडा पार केला असून 210 रुपये किलोवर ति जाऊन पोहोचलीय. तिळीचे दर गगनाला भिडल्याने साहजिकच याचा परिणाम तिळगुळाच्या लाडूवरही झाला असून लाडूही 20 ते 25 टक्क्यांनी महागले आहेत. गुजरातमध्ये तिळीचे उत्पादन घेतले जाते, सध्या मागणी वाढल्याने आणि त्या तुलनेत आवक कमी झाल्याने भाव वाढले आहेत. हल्लीच्या धावपळीच्या युगात घरी लाडू बनवणं अनेक महिलांना शक्य होत नसल्याने रेडिमेड लाडू खरेदीला त्या अधिक पसंती देतात. दरम्यान हे तिळीचे लाडू नक्की कसे बनवले जातात ? यंदा कशी मागणी आहे ?  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram