Nashik | नाशिकमध्ये कोरोना रुग्णांना बेड्स मिळेना! 3 दिवसांपासून बेड मिळत नसल्याची तक्रार

कोरोना रुग्णाना नाशिक शहरात बेड्स मिळत नसल्याने सामाजिक कार्यकर्ते दीपक डोके हे आज संध्याकाळी 2 रुग्णाना घेऊन थेट महापालिकेच्या प्रवेशद्वारावर आले आणि एकच खळबळ उडाली. यातील एक रुग्ण गंभीर असून त्याला ऑक्सीजन सिलेंडरही लावण्यात आले होते. हा सर्व प्रकार बघून शिवसेना नगरसेवक इथं दाखल झाले आणि त्यांनी तात्काळ रुग्णवाहिका बोलवत पालिकेच्या बिटको हॉस्पिटलमध्ये या रुग्णांना रवाना केले. पालिका फक्त बेड्स असल्याचा दावा करते. मात्र, 3 दिवसांपासून बेड्स मिळत नसल्याने आज नाइलाजास्तव आम्हाला रुग्ण घेऊन पालिकेत यावे लागले. असं सामाजिक कार्यकर्ते सांगत असून महापालिकेच्या कारभारावर शिवसेनेही संताप व्यक्त केलाय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola