Nashik : नाशिकमध्ये १ डिसेंबरपासून नाशिकमध्ये दुचाकीस्वारांना हेल्मेट बंधनकारक
Continues below advertisement
नाशिकमध्ये हेल्मेटसक्तीचा मुद्दा पुन्हा गाजण्याची शक्यता आहे.. १ डिसेंबरपासून नाशिकमध्ये दुचाकीस्वारांना हेल्मेट बंधनकारक करण्यात आलंय.. हेल्मेट परिधान केलं नाही तर मोटर वाहन कायद्यानुसार कारवाईसह पाचशे रुपये दंडही आकारला जाऊ शकतो., हेल्मेट न घातल्यामुळे चालू वर्षात आतापर्यंत ८३ दुचाकीस्वारांचा मृत्यू तर २६१ जण गंभीर जखमी झाल्याची पोलिसांकडे नोंद करण्यात आलीय. माजी पोलीस आयुक्त दीपक पांडे यांच्या काळात नाशिकमधील हेल्मेट सक्तीचा मुद्दा हा राज्यभर चर्चेत राहिला होता.. मात्र त्यांच्या बदलीनंतर ही मोहीम थंडावली होती.. आता पुन्हा या मोहिमेला नाशिककर कसा प्रतिसाद देणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.
Continues below advertisement