Nashik : नाशकात नो हेल्मेट, नो पेट्रोल; हेल्मेटसक्तीच्या अंमलबजावणीसाठी पोलिसांची शक्कल ABP Majha
नाशिकमध्ये 15 ऑगस्टपासून पुन्हा हेल्मेटसक्ती लागू होणार आहे. मात्र, या हेल्मेटसक्तीची अंमलबजावणी जरा वेगळ्या पद्धतीने केली जाणार आहे. कारण दुचाकीचालकाने हेल्मेट परिधान केलेलं नसल्यास त्याला शहरातील पेट्रोलपंपावर पेट्रोल मिळणार नाही.