Nashik Rain : नाशिकमध्ये पावसाची संततधार, गंगापूर धरणातून विसर्ग सुरु; गोदावरीच्या पाणीपातळीत वाढ
Continues below advertisement
नाशिकमध्ये पावसाची संततधार सुरु आहे. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाने हजेरी लावलीय.. त्यामुळे गंगापूर धरणातून गोदावरीच्या पात्रात विसर्ग करण्यात येतोय.. या विसर्गामुळे गोदावरीच्या पाणीपातळीत वाढ झालीय.. पुराची ओळख म्हणून समजल्या जाणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत सध्या पाणी आलंय. पावसाचा जोर कायम राहिल्यास विसर्गात वाढ करण्यात येणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलाय.
Continues below advertisement