Gauri Poojan : जर्मनीतील मूर्तिकारानं साकारल्या गौरी, नाशिकमध्ये सुंदर मुर्ती ठरतायेत आकर्षण

Continues below advertisement

नाशिकच्या शहाणे कुटुंबियांनी चक्क जर्मनीला महालक्ष्मीच्या मूर्ती तयार केल्या असून जून्या नाशिकच्या घरी सोनपावलांनी त्यांचे आगमन झाले आहे. अत्यंत सुंदर, देखणं आणि अनोखे असे त्यांचे रूप आहे. लग्न झाल्यानंतर पहिल्यांदाच माहेरी आलेल्या माहेरवाशिणीच्या चेहऱ्यावर जो आनंद बघायला मिळतो तसाच भास या गौरींकडे बघितले की होतो. पश्चिम जर्मनीतील एका कारागिराने चार महिने मेहनत घेत या मूर्ति साकारल्या आहेत, फायबरच्या जरी वाटत असल्या तरी त्या शिवण या भरीव लाकडापासून बनवण्यात आल्या आहेत. एका गौरीचे वजन हे जवळपास ८० किलो एवढे असून त्या १०० वर्ष टिकतील असा अंदाज आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram