Nashik Godavari Update : गोदावरीचं पाणी पाहायला गेले, लेक पाण्यात पडली; आई-वडिलांनी मारली पाण्यात उडी

Continues below advertisement

नाशिक : गेल्या दोन दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात मुसळधार पाऊस (Heavy Rain) बरसत आहे. मुसळधार पावसाने आणि गंगापूर धरणातून (Gangapur Dam) पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने गोदावरी नदीपात्रात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच रामकुंड (Ramkund) परिसरातून 29 वर्षीय युवक पुराच्या (Flood) पाण्यात वाहून गेल्याची घटना घडली आहे. आईच्या डोळ्यादेखतच युवक वाहून गेल्याने आईने टाहो फोडला. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. तर एका तीन वर्षीय मुलीला वाचवण्यात जीवरक्षकांना यश आले आहे. 

गंगापूर धरणातून आज दुपारी 12 वाजता एकूण 500 क्युसेकने विसर्ग सोडण्यात आले आहे. तर दुपारी 3 वाजता एकूण 1 हजार क्युसेकने विसर्ग करण्यात येणार आहे. तसेच पावसाचा जोर कायम असल्यास टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढविण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. विसर्गामुळे गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने गोदावरी नदीपात्रात पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. त्यातच रामकुंड येथे 29 वर्षीय पर्यटक वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 29 वर्षीय पर्यटकाला शोधण्यासाठी प्रशासनाचे शोध कार्य सुरू आहे. तर तीन वर्षाची मुलगीदेखील पाण्यात पडली होती. मात्र, तिला वाचवण्यात जीव रक्षकांना यश आले आहे. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram