Raj Thackrey in Pune : पुण्यातील एकता नगरमधून राज ठाकरेंचा नागरिकांशी संवाद
abp majha web team
Updated at:
04 Aug 2024 01:23 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppRaj Thackrey in Pune : पुण्यातील एकता नगरमधून राज ठाकरेंचा नागरिकांशी संवाद
लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आगामी विधानसभा निवडणुका स्वबळावर लढणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या महाराष्ट्र दौऱ्याला आजपासून (रविवार, 4 ऑगस्ट) सुरुवात होत आहे.
राज ठाकरे पहिल्या टप्प्यात सोलापूर आणि मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांवर फोकस करणार आहेत. पुण्यात पूरग्रस्त नागरिकांशी राज ठाकरे पुन्हा एकदा चर्चा करणार असून त्यानंतर ते सोलापूरकडं रवाना होतील. राज यांनी मागच्या आठवड्यातही पुण्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी करत नागरिकांशी संवाद साधला होता.