Ganesh Chaturthi 2021 : गणपती बाप्पा मोरया! उत्साहपूर्ण वातावरणात नाशकात घराघरांत गणरायाचं आगमन

यंदाचा गणेशोत्सव कोरोना संकटात पार पडतोय. कोरोनाचे नियम पाळत घराघरांत गणेशोत्सव साजरा केला जातोय. सगळीकडे आनंदाचं, उत्साहाचं आणि चैतन्याचं वातावरण आहे. घरगुती गणपतीच्या आगमनासाठी 5 जणांच्या उपस्थितीची परवानगी देण्यात आलेली आहे. तर सार्वजनिक गणपतींच्या आगमनासाठी 10 जणांच्या उपस्थितीची परवानगी देण्यात आली आहे. नाशकातही मोठ्या उत्साहात गणरायाचं आगमन पार पडत आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola